जंगलात लपविलेल्या ४ दुचाकींसह चोपड्यातून एकाला अटक

0

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच चोरीच्या दुचाकी तसेच गावठी कट्ट्यासह चोपडा शहरातून राहूल सुरेश कोळी (वय-23, रा. वरवाडा ता.शिरपूर जि.धुळे) याला अटक केली आहे. चोपडा शहरात चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती अधिक्षक दत्ता शिंदे यांनी मिळाली होती त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाबाबत सुचना केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बागुल, युनुस शेख, सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, हरीष परदेशी, दिपक पाटील, प्रविण हिरवाडे या पथकाने रविवारी चोपडा शहरात विवेकांनद विद्यालयाजवळ सापळा रचून राहूल कोळी यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला शर्टाखाली असलेले गावठी कट्टा मिळून आला.

जंगलात लपविल्या चोरीच्या दुचाक्या
संशयित राहूल कोळी यास खाकीचा हिसका दाखविल्यावर त्याने दुचाकी चोरीची माहिती दिली. त्याने चोपडा पंचायत समितीसह विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी केली. व त्यादुचाक्या स्त्रासेन परीसरातील जंगलात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याला दुचाकी व गावठी कट्ट्यासह ताब्यात घेवून त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.