पिता-पुत्र सातपुड्यातील जामुन-झिरा येथील.
जळगाव: सातपुड्यातून पिता व पुत्र घरी येत असताना जंगली वराह तथा डुकराच्या हल्ल्यात जामुनझिरा येथील 16 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी १२ वाजेच्या सुमारास घडली. तरी या हल्ल्यात मुलाला वाचवितांना वराहासोबत झालेल्या झटापटित वडील सुद्धा जबर जखमी झाले असुन त्यांना त्यास पुढील उपचारार्थ जळगावला रवाना केल्याची माहिती डॉक्टर बारेला यांनी दिली.
रविवारी दुपारी 11 ते 12 वाजेच्या सुमारास सातपुडा पर्वतातील जामुनझिरा येथील पिता-पुत्र अनुक्रमे साबासिंग रेंजला बारेला (वय 45 ) राजू साबासिंग बारेला (वय 16) हे दोघं मध्यप्रदेशातील गोट्या या गांवाहून जामुनझिरा येथे येत असताना यावल तालुक्यातील आंबापाणी या गावाच्या खाली अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एका रानटी वराहाने अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजू साबासिंग बारेला (वय 16) हा जागीच ठार झाला, त्यानंतर त्याचे वडील सांबासिंग रेंजला बारेला यांनी जोरदार झुंज देऊन झटापटी करुन रानटी डुकराला जागीच ठार केले, या झटापटीत सभा सिंग बारेला सुद्धा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपस्थित नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात तात्काळ आणून औषध उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले.
या घटनेची माहिती मिळताच मोहराळा तालुका यावल येथील पोलीस पाटील युवराज जयसिंग पाटील, दहिगाव येथील माजी सरपंच देविदास धांगो पाटील, श्यामराव अशोक पाटील, लहू रामचंद्र पाटील, गजानन मुरलीधर पाटील, यांच्यासह यावल पश्चिम वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल असलम खान,व्ही.के.बोराडे, वनरक्षक किरण गजरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पुढील मदत कार्य केले, मयताचासह जखमी व घटनेचा पंचनामा यावल पोलिसांनी केला शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रल्हाद पवार यांनी केले. या घटनेमुळे यावल तालुक्यात तथा सातपुडा वनक्षेत्रातील आदिवासी बांधवांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.