जंगली वेलीच्या विळख्यातून हिरव्या तलावाला मुक्ती कधी ?

0

बोदवड : शहरात असलेल्या हिरव्या तलावातील पाण्याचा उपयोग गायी, बैल, म्हशींसह अन्य मुक्या जनावरांसाठी केला जात असलातरी गेल्या पावसाळ्यापासून तलावातील पाण्यामध्ये जंगली वेलींचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यामुळे मुक्या जनावरांना तलावातील पाण्याचा उपभोगापासुन वंचित रहावे लागत आहे. या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी बोदवडमधील शिवसेना पदाधिकार्‍यांनी केली आहे.

मुक्या प्राण्यांना तलावातील पाण्याचा दिलासा
विषेशतः उन्हाळ्यामध्ये दुभती जनावरे बैल, गायी या उष्णतेपासुन बचाव करण्यासाठी तलावातील पाण्यात पोहतात व पाण्यात बसते असतात मात्र तलावात जंगली वेलाचा भयानक प्रमाणात फैलाव झाला आहे. जामठी रोडवरील तलावाचे पाणी आटण्याच्या परीस्थितीत आहे तलावातील जंगली वेलीचा फैलाव इतका भयानक आहे की, एखांदी व्यक्ती जर का दुदैवाने तलावात पाण्यात पडली तरी त्याचा कोणताच सुगावा लागणार आहे. पावसाळा उंबरठ्यावर असून आणखी हिरव्या तलावात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा वावढणार आहे शिवाय जंगली वेलीला नष्ट नाही केल्यास आणखी त्यांचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यामुळे अशा परीस्थितीत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी गजानन खोडके, शांताराम कोळी, सुनील बोरसे, हर्षल बडगुजर, आनंदा पाटील, भास्कर गुरचळ, गोपळ पाटील, समीर शेख, शैलेष वराडे आदींनी केली आहे.