जखमा सांधण्यासाठी गोगलगायींचा स्त्राव उपयुक्त

0

लंडन : जखमा सांधण्यासाठी अनेक मलमे आणि औषधे आहेत पण ती दीर्घकालासाठी उपयुक्त नसतात. यापासून सुटका होण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका गमचा शोध लावला आहे. निसर्गातील शिंपल्या प्रजातीमधील गोगलगायीपासून बोध घेऊन त्यांनी हा गम शोधला आहे.

पेशींना इजा झाली की त्या सांधण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यांचा तितकासा उपयोग होत नाही कारण कधी पेशींना ते मलम विषसमान होतात तर कधी ओल्या पृष्ठभागावर काम करीत नाहीत. या शिवाय काही औषधे इतकी घट्ट आणि टणक असतात की सतत बदलत असलेल्या पेशीसमुदायाला ती वेदनादायक ठरतात.