जळगाव – शनिवार 21 सप्टेंबर रोजी धानोरा-अडावद रस्त्यादरम्यान झालेल्या अपघातात कानळद्याचे दोन तरूण गंभीर जखमी झाले होते. यात बापू रामदास ठाकरे हा गंभीर जखमी झाला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बापू रामदास ठाकरे आणि कैलास शालीक मोरे दोन्ही रा. कानळदा ता.जि.जळगाव हे दोघे मोटारसायकलने गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञान वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. यातील बापू रामदास ठाकरे यांचा सोमवार 24 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.