जळगाव – शहरातील तांबापुरा भागात चितपट खेळण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. या
हाणामारीत रस्त्याने जाणारा मोटारसायकलस्वार युवक निलेश भाऊराव सपकाळे (वय ३३ रा.हरिविठ्ठल नगर) हा गंभीर जखमी झाला होता.
खाजगी रुग्णालयात उपचार असतांना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. शहरातील तांबापुरा भागात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक
झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली होती. या दगडफेकीत रस्त्यावरून जात असलेला नीलेश सपकाळ हा
तरूण जखमी झाला होता.