जखमी तरसाला नागरिकांच्या मदतीने दिले जीवनदान

0

तळोदा । तालुक्यातील रोझवा शिवारात रांझणी येथील शेतकरी यशवंत विष्णू मराठे यांच्या शेताजवळील नाल्यात एक तरस ईश्वर मराठे, जितेंद्र पाचोरे यांना दुपारच्या सुमारास मरणासन्न अवस्थेत आढळून आले. याबाबत तात्काळ वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांच्याजवळ संपर्क साधला असता वनकर्मचारी घटनस्थळी दाखल झाले तरसाला अलगद ताब्यात घेतले तळोदा येथील मेवासी वन विभागाच्या कार्यालय परिसरात सुरक्षीत पिंजर्‍यात ठेवले व त्यास पाणी पाजले व खाऊ घातल्याने त्वरित तरस शुद्धीवर आले औषध उपचार सुरु आहे

शेतकर्‍यांनी दिली माहिती
तळोदा तालुक्यातील रोझवा व रांझनी शिवार परिसरात रांझणीचे शेतकरी यशवंत विष्णू मराठे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात तरस असल्याचे जितेंद्र पाचोरे यांनी शेतात पहाणी करत असलेल्या ईश्वर मराठे यांना सांगितल्यावर त्याठिकाणी गेले असता तरस मरणासन्न अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यानंतर ईश्वर मराठे यांनी तळोदा वन परिक्षेत्राचे अधिकारी अशोक पाटील यांना कळविले. लागलीच अशोक पाटील यांनी आपल्या वन करणार्‍यांना सूचना नुसार वनकर्मचारी वनरक्षक अमोल पवार, वनरक्षक ज्योती खोपे, वनरक्षक समाधान साळवे यांनी आपल्या वन विभागाच्या व्हॅनने घटनास्थळी दाखल झाल्याने तरसाला सुरक्षित वाहनांत तळोदा येथील विभागीय कार्यालयात आणले.

औषधोपचारानंतर सोडणार
वनक्षेत्रपाल अशोक पाटील व वनकर्मचारींनी पाणी पाजले व खाऊ घातल्याने तरस शुद्धीवर आले. या बाबत तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटिल यांनी ईश्वर मराठे यांचे आभार मानले. तरसावर पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे यांनी उपचार करीत आहेत. तरसाची देखभाल वन क्षेत्रपाल अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजविहिर क्षेत्राचे वनरक्षक अमोल पवार, धनपूर दुरक्षेत्राचे वनरक्षक ज्योती खोपे, वनरक्षक समाधान साळवे, वनमजूर मराठे करीत आहे दरम्यान, सदर तरसाला औषधोपचार करून व्यवस्थित झाल्यानंतर जंगलामध्ये सोडणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. उन्हाच्या काहिलीने त्रस्त वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ फिरतांना जखमी होत असल्याचे देखील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.