जखमी रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव – रेल्वेच्या धक्क्याने जखमी झालेल्या 30-35 वर्षाच्या वयोगटातील अनोळखी व्यक्ती जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, 30-35 वयोगटातील अनोळखी पुरूषाला 9 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास पाचोरा येथील रेल्वेच्या धक्क्या लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. गुरूवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पेठ पोलीसांनी केले आहे.