काळेवाडी : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हातगाडी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केशवराम किसन गनगे (वय 50, रा. अदिनाथ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे त्यांचे नाव आहे. एक नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास काळेवाडीतील अमरदीप कॉलनीसमोर हा अपघात झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवराम हे त्यांच्या हातगाडीवर पेरूची विक्री करत होते. भरधाव येणार्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात केशवराम यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलिस तपास करत आहेत.