पिंपरी-चिंचवड : जगताप डेअरी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या चौकात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सोमवार (दि. 21) पासून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. जगताप डेअरी येथील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून तो पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत व सुरळीत होणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावील असे आवाहन सांगवी वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असे आहेत बदल
1) वाकड वाय जंक्शन येथून जगताप डेअरी चौकाकडे (साई चौक) जाणार्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सरळ कस्पटे चौकातून जगताप डेअरी चौकातून इच्छित स्थळी जावे.
2) शिवार चौकातून येणार्या वाहनांना जगताप डेअरी चौकातून उजवीकडे वळून काळेवाडी फाट्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी सरळ जाऊन सावित्रीबाई फुले उद्यान चौकातून युटर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
3) काळेवाडी फाटा, रावेतकडून येणार्या वाहनांना जगताप डेअरी चौकातून सरळ औंध व पुणेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी जगताप डेअरी चौकातून उजवीकडे वळून कस्पटे चौकातून इच्छित स्थळी जावे.