चिंचवड : महापालिका आणि पिंपरी-चिंचवड न्यू टाऊनशिप डेव्हलपमेंट अॅथॉरिटी यांच्यावतीने जगताप डेअरी चौकात ग्रेड सेपरेटर, पार्क स्ट्रीट येथे सबवे व जगताप डेअरी चौक येथे दुहेरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या भागात वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री साडेअकरा या वेळेत बंदी केली आहे. काळेवाडी फाटा चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यानच्या रस्त्यावर लक्झरी बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शासकीय वाहने व रुग्णवाहिका वगळता बंदी घालण्यात आली आहे. कस्पटे चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यानच्या रस्त्यावर लक्झरी बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शासकीय वाहने व रुग्णवाहिका वगळता बंदी घालण्यात आली आहे.