तळेगाव ढमढेरे । जगताप वस्ती-टाकळी भीमा या रस्त्यावरील पुलाचा भराव पावसात वाहून गेला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ग्रामस्थांची गरज लक्षात घेता पुलाची पाहणी करताना शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या पुलासाठी जिल्हा नियोजानमधून 71 लाख रुपये मंजूर केले असून लवकरच हे काम सुरू होणार आहे.
पावसामुळे तळेगाव ढमढेरे-जगताप वस्तीकडे जाणारा मुरुमाचा भराव टाकून केलेला रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे वाहतुकीला त्रास होत होता. आमदार पाचर्णे यांनी या पुलासाठी जिल्हा नियोजनमधून 71 लाख रुपये मंजूर केले आहेत. यावेळी शिरूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्रीकांत सातपुते, घोडगंगाचे संचालक पोपटराव भुजबळ, सुदाम भुजबळ, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, उपसरपंच संभाजी ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे, कैलास नरके, डॉ. राजेंद्र ढमढेरे, युवा कार्यकर्ते सुधीर भुजबळ, गोविंद भुजबळ, रवी शेलार, सुरेश चव्हाण, सुदाम नवले, उपसरपंच भरत चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे येथील रस्त्यावर पावसामुळे खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. राष्ट्रीय महामार्ग जानेवारीत सुरू होईपर्यंत या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची लवकरात लवकरच डागडुजी करून दुरुस्ती करण्यात येईल, असे शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.