जगत जननी नारीशक्तीला सर्वत्र नमन !

0

जळगाव । आज असे एकही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदत तेरेसा, कल्पना चावला यांसारख्या अनेक कर्तुत्ववान महिलांचा आदर्श घेत आजच्या महिला यशाखी शिखरे गाठत आहे. चुल आणि मुल येवढ्याच चौकशीत असलेली महिला आज देशाचे नेतृत्व करतांना दिसत असल्याने जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

महिला अबला नाही सबला आहेे
महिला म्हणून आयुष्यात खूप संकटांना समोरा जावे लागते. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती आली तरी खंबीरपणे उभे राहून त्याला उत्तर द्या. कुटुंबातील आपल्या जबाबदार्या समजून घ्याव्यात. कुणावरही अवलंबून न राहता स्वबळावर आपली ओळख निर्माण करा. न्यायव्यवस्थेने कायद्याच्या चौकटीत दिलेले महिला अधिकार स्वतंत्र याचा पुरेपूर लाभ घ्या. त्यासाठी परिश्रम हाच पर्याय आहे. तसेच महिला अबला नाही तर सबला आहे हे विसरता कामा नये असे मत आय.एम.आर.महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.शमा सराफ यांनी व्यक्त केले. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट मधील महिला दिना निमित्त आशा फाउंडेशन व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सुरक्षा या विषयावर ते बोलत होते. तर महिला सक्षम आहे सर्व काही करण्याची धमक आपल्यात आहे याचा विसर पडू नये तरच तुमचा आत्मविश्वास जिवंत राहील आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येईल.

जेसीआय जळगावतर्फे पाच महिलांना पंचरत्न पुरस्कार
शहरातील जेसीआय जळगावतर्फे नुतन मराठा महाविद्यालयाच्या अध्यापक विद्यायात आज महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात यश मिळालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.संगिता महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रातील पाच महिलांना पंचरत्न पुरस्कार देवून सत्कार करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते पंचरत्न पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात नुतन कॉलेज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.शशिकला सोनवणे यांना जेसी विद्यारत्न पुरस्कार, डॉ.सरोज दोरीक यांना जेसी मानवता पुरस्कार, रेखा चौधरी यांना जेसी किसानरत्न पुरस्कार, फातेमा बी गलाबाज खान यांना जेसी उद्देमारत्न पुरस्कार आणि प्रा.कांचन विसपूते यांनी जेसी खेलरत्न पुरस्कार याप्रमाणे देण्यात आले. यावेळी जळगाव जेसीआयचे अध्यक्ष प्रा.रफिक शेख, राजेंद्र धर्माधिकारी, जयश्री पाटील, जरियान सैय्यद, जिनल जैन, वरूण जैन, प्रतिक शेठ, शरद मोरे यांची उपस्थिती होती.

आत्मविश्वास असल्यास संकटावर मात
यावेळी पोलीस दलाचे प्रशिक्षक विनोद आहिरे यांनी महिलांना आत्म सुरक्षा कशी करावी याचे प्रात्याक्षिके करून दाखविली. यात त्यांनी संकट काळात कोणत्या ठिकाणी मारा केला तर समोरची व्यक्ती मृत्यू होऊ शकते. तर शरीरातील कोणत्या भागावर मारा केला तर गंभीर जखमी होऊ शकते याच्या विविध बाबी त्यांनी सांगितल्या. महिलांमध्ये आत्मविश्वास असला तर कोणत्याही संकटावर मात करू शकतात. त्यामुळे स्वत: लढायला शिका. आत्महत्या करण्याची नाही तर आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे,समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर तेवढी उंची गाढण्याचे प्रयत्न करा, असे मत संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले. प्रसंगी अभियांत्रिकी, कनिष्ठ महाविद्यालय व पॉलिटेक्निकच्या सर्व विद्यार्थिनी महिला प्राध्यापिका उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रिया नागदेव तर आभार विनिता कालराणी यांनी मानले.

…. तर स्त्रीभू्रणहत्या थांबणार
पूर्वीपासून सुनेकडून मुलीप्रमाणे कर्तव्याच्या अपेक्षा केल्या जातात. त्याप्रमाणे जावायाने सुध्दा मुलाप्रमाणे जबाबदारी घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. असे झाल्यास स्त्रीभू्रणहत्या नक्कीच थांबेल असे विचार पत्रकार पल्लवी भोगे यांनी मांडलेत. खान्देश एज्युकेशन संचालित ए.टी.झांबरे विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा पर्यावरणास पूरक रोपटी देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशश्री सोनार, चारूशीला साळूंखे, देवश्री चौधरी, कुंतला सपकाळे या विद्यार्थींनीनी महिलांविषयी विचार मांडलेत. शाळेतील सर्व शिक्षीकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलादिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक व्ही.डी.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शालेय समन्वयक के.जी.फेगडे, उषा चौधरी, चंद्रकांत भंडारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता झांबरे यांनी केले.

बालकल्याण समितीतर्फे कार्यक्रम
महिला दिनानिमित्त महापालिकेत महिला व बालकल्याण समितीतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमात नऊ वस्तीस्तर संघ, एक शहर संघाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल कल्याण समिती सभापती कांचन सोनवणे होत्या. याप्रसंगी स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, एसटी महामंडळ जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर, नगरसेविका ममता कोल्हे, सिंधुताई कोल्हे, खुशबू बनसोडे, ज्योती चव्हाण, लिना पवार, पद्माताई सोनवणे, उज्वला बेंडाळे, पार्वताबाई भिल, संगिता दांडेकर, सुभद्रा नाईक, वैशाली विसपुते, ज्योती इंगळे व डॉ. सुजाता महाजन आदी.

रिपाइं (अ) महिला आघाडीतर्फे गरजूंना साड्या वाटप
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) महिला आघाडीचे जळगाव तालुकाध्यक्ष रमाताई ढिवरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रियंका पाटील, महानगराध्यक्ष सागर सपकाळे यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संदेश यांच्याहस्ते कष्टकरी घर कामगार महिलांनासाडी वाटप करण्यात आले. यावेळी हर्षाली देवरे, पुजा बाविस्कर, मीना कोळी, लता वाघ,सुरेखा बेडसे, सुलोचना माळी, निलीमा वरणकर, संगीता पवार, रेखा जगताप, अनिता पाटील, रेखा जाधव, गोदाबाई राठोड, मीना भावसार, कल्पना इंगळे, लता पाटील, संगिता वानखेडे, सिमा भोई, देवका नन्नवरे, मनिषा पाटील, पुडलिंक राठोड, सुरेश खैरनार, सुधाकर ढिवरे, रोहन ढिवरे, योगेश वाणी, शोभा खैरनार यांच्यासह आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस मुख्यालयात महिला मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन
महिला दिनानिमित्त पोलिस मुख्यालयातील परिसरात तयार करण्यात आलेल्या महिला मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते करण्यात आले. महिला मार्गदर्शन कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधीक्षका मोक्षदा पाटील, उपअधीक्षक गृह महारू पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, गुन्हे शाखेचे राजेशसिंह चंदेल, पोलिस निरीक्षक जयंत सुभेदार, शालीक उईके, निता मांडवे, प्राची राजुरकर, काचंन काळे, सुनिता कोळपकर , सुमन कोलते, सविता परदेशी, गायत्री पाटील, अलका शिंदे, ललिता सोनवणे, मिनल साकळीकर, वंदना अंबिकार, वैशाली पाटील, शैला एडीस, पल्लवी मोरे, छाया मराठे तसेच शहरातील महिला सदस्या ज्योती चव्हाण, सरीता नेरकर, जरीना बोहरा, अ‍ॅड. मंजूळा मुंदडा, वासंती चौधरी, डॉ. महाश्‍वेता वैश्य, मिना सोनार, निलु इंगळे, मंगला सोनवणे, शोभा कुमावत, शोभाताई चौधरी, सुनिता भालेराव, निर्मला चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला दिनानिमित्त ‘भाऊंचे उद्याना’त आरोग्य शिबीर
जागतिक महिला दिनानिमित्त हेल्दी यू वेलनेस सेंटर व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊंचे उद्यान- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्क येथे महिला आरोग्य जागर या विषयांतर्गत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हेल्दी यू वेलनेस सेंटरच्या प्रमुख, योग तज्ज्ञ दिपा लोढा यांनी यावेळी योगाचे धडे दिले. सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबीरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती नोंदविली. तसेच उद्यानात उपस्थित असलेल्या शहरवासियांनीदेखील या योग शिबीराचा लाभ घेतला. दिपा लोढा यांनी सदृढ प्रकृतीसाठी योग अत्यंत आवश्यक असून महिलांनी आरोग्याबाबत जागरुक राहण्याचे आवाहनदेखील यावेळी केले.

जळगाव रनर्स ग्रृपतर्फे सिटी ‘रन अ‍ॅण्ड वॉक’
स्वस्थ महिला-स्वस्थ परिवार हे सामाजिक संदेश घेवून जागतिक महिला दिन निमित्त सिटी ‘रन अ‍ॅण्ड वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा सागर पार्क येथून सुरु हुयुन काव्यरत्नावली चौक,महाबळ मार्गे सागर पार्क येथे सांगता करण्यात आली. रन अँड वॉक हि स्पर्धा वयोगट 18-25, 26-35 व 36 वर्षाच्या पुढे या तीन गटात घेणायत आली. 18-25 या वयोगटात जैन स्पोर्ट्स अकादमीची हॉकी खेडाळू मोहिनी माळी प्रथम, राजश्री मनोहर द्वितीय, वैशाली कोठावदे तृतीय, तर 26-35 वयोगटात रनर्स ग्रुपची अंकिता अमर कुकरेजा प्रथम, गरिमा मलारा द्वितीय, अमृता राणा तृतीय व 36 वर्षाच्या पुढे रनर्स ग्रुपचा प्रेमलता प्रकाश सिंग यांना प्रथम, सोनाली महाजन द्वितीय व डॉ.जयश्री राणे यांना त्रितीय पारितोषिक देण्यात आले. तसेच सिंधू विसावे, उषा पाटील व प्रेमा जवाराहानी या वयोवृद्ध महिलांना उतेजनार्थत पारितोषिक देण्यात आले. या सिटी रन जळगाव शहरातून सर्व महिलांनी उत्फुर्स प्रतिसाद दिला व 225 एवढ्या मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती. अतिशय उत्साहाच्या वातावरणात महिला दिनचा शुभेच्छा देवून या रन चा समारोप सागर पार्क येथे करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात महिला डॉक्टरांचा झाला सन्मान
शहरातील धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर प्रदर्शनातुन स्त्री-पुरूष समानतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. जागतिक महिला दिनानिमीत्त धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रूग्णालयात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रियंका गंगाथडे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विजयी स्पर्धेक आणि सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला फ्रुट सेलचे संचालक भालचंद्र चौधरी, अनिल पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ.अनिता नागरगोजे, प्रशासन अधिकारी हेमंत पाटील, संगीता पाटील, क्षेत्रकार्याचे प्रशिक्षणार्थी कपिल पानपाटील, सारिका चरडे, विशाल पालवे, अजिंक्य पवार, दिपक पाटील, जावेद पटेल, सोनु चव्हाण आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. निलेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.