जगन्नाथ रथयात्रेची जय्यत तयारी

0

जळगाव । आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (आइस्कॉन) जगन्नाथ रथयात्रा सेवा समितीच्यावतीने शनिवार 17 जून शनिवार रोजी शानभाग सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे आइस्कॉनतर्फे जगन्नाथ रथयात्रेचे तिसरे वर्ष असून जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण जळगाव शहरातून सहयोग मिळत आहे. जगन्नाथ रथयात्रा संपन्न करण्यासाठी अनेक भक्तांचे सहकार्य मिळत आहे.

251 किलो भोग अर्पण करण्यात येणार
यामध्ये झांशीहून सुंदरलाल प्रभु ,वृंदावनहून शामसुंदर प्रभु ,मुंबई हून रेवती प्रभु व नागपूरहून विशाल प्रभू यांचा राधाकृष्ण नृत्यगृप असणार आहे. ठाणे मुंबई येथून 50 भक्त विविध सेवेसाठी दाखल होत आहे. सुनिल मंत्री यांचेतर्फे 251 किलो भोग अर्पण करण्यात येणार आहे. सर्व महाराज व वरिष्ठ भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रथयात्रा,व्यासपीठ, मंदिर फुलांची सजावट सुनिल मंत्री यांच्या वतीने देण्यात येत आहे. सभामंडप आणि भोजनाचे नियोजन शतनू पाटील व नरेश खंडेलवाल यांच्यातर्फे करण्यात येत आहे. जगन्नाथ रथयात्रेत मंदिरातील विविध भक्त सेवा देणार आहेत. इस्कॉनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन 17 जूनला जी.एस. ग्राऊंडयेथे केले जात े आहे.