जगप्रसिध्द जहाँगिर गॅलरीत जळगावातील गुरु-शिष्यांची एकाचवेळी झळकणार चित्रे

0

शिष्य आर्टीस्ट शिवम हुजूरबाजार, गुरु योगेश सुतार यांचा सहभाग ; पत्रकार परिषदेत दिली माहिती ; 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान मुंबईला चित्रप्रदर्शन

जळगाव – जगप्रसिद्ध अशा मुंबईच्या जहांगिर आर्ट गॅलरी दि. 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या चित्र प्रदर्शनात जळगावातील 23 वर्षीय शिवम संजीव हुजुरबाजार यांचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींग या प्रकारातील दोन चित्र झळकणार आहेत. अशाप्रकाराचा बहुमान मिळालेला शुभम जिल्ह्यातील एकमेव आर्टिस्ट आहे. विशेष म्हणजे ज्या शिक्षकांकडून, गुरुंकडून शुभमने धडे गिरविले, मार्गदर्शन घेतले. असे त्याचे गुरुवर्य योगेश सुतार यांचेही चित्रे याच चित्रप्रदर्शनात झळकणार आहे. अशाप्रकारे जहाँगिर आर्ट गॅलरीत गुरु -शिष्य अशी दोघांची एकाचवेळी चित्र असा सुंदर योगायोग जहाँगिर भेट देणार्‍या देश विदेशातील चित्र रसिकांना अनुभवता येणार आहे.

शुभम हुजुरबाजार याच्या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शुभमच्या आजवरच्या यशासह जहाँगिरी आर्ट गॅलरीत होत असलेल्या चित्रप्रदर्शनाबद्दल माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला शिवमसह डॉ.संजीव हुजुरबाजार, डॉ. आरती हुजुरबाजार, ललीत कला अकादमीचे पियुष रावल हे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे 22 रोजी उद्घाटन होणार आहे.

हजारो चित्रांची केली निर्मिती
शिवम हा सुप्रसिध्द समाजसेवी कै.डॉ.अविनाश आचार्य , कै. अनुराधा आचार्य यांचा नातू असून सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. संजिव हुजूरबाजार व स्त्रीरोगतज्ञ डॉ. आरती हुजूरबाजार यांचा मुलगा आहे. ड्राईंगची आवड असल्यामुळे पेंटिंग ते अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असा शुभमचा प्रवास झाला. सुरुवातीला कॉम्प्युटरवर निरनिराळी चित्रे काढण्याचा छंद व त्यातूनच हजारो चित्रांची निर्मिती शिवमने केली. या कामी त्याला त्याच्या आई- वडिल व बहिणी यांचे सहकार्य तर शिक्षक प्रा.जितेंद्र भारंबे, योगेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जगप्रसिध्द आर्टीस्ट होण्याचा मानस
माझ्या मनातला कॅनव्हास राजा रविवर्मा कलादालन घोळे रोड, शिवाजी नगर, पुणे याठिकाणी ऑगस्ट महिन्यात चित्रप्रदर्शनातील शुभमच्या कलेला पुण्यातील चित्र रसिकांनी भरभरुन दाद दिली होती. आतापर्यंत चार चित्रप्रदर्शन झाले असून मुंबईच्या जहांगिर ऑर्ट गॅलरीतील अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचे चित्र प्रदर्शन हे शिवमचे पाचवे चित्रप्रदर्शन आहे. अगदी कमी वयात वयाच्या 23 व्या वर्षीच शिवमच्या चित्रकृतींना पाच प्रदर्शनात झळकण्याचा मान मिळाला. शिवमच्या चित्रांचे विषय हे निसर्गाशी संबंधीत व आधारीत आहे. जहाँगिर गॅलरीत होत असलेल्या चित्रप्रदर्शनासाठी त्याने 5 चित्र पाठविली होती. त्यातून दोन चित्रांची निवड झाली. यातील एक चित्र स्वर्ग व नरक या विषयावर तर दुसरे मुंबईचे जीवन या विषयावर आहे. ज्या गॅलरीत आतापर्यंत विविध प्रदर्शन बघितले, त्यात जगप्रसिध्द गॅलरीत आता माझी चित्र झळकणार असल्याने खूप मोठा आनंद आहे. पेंटिंग व ड्रॉईंग मला खुप काही शिकवून जातात व प्रेरणा देतात असा शिवमचा विश्वास असून अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेटींगमध्ये जगप्रसिध्द आर्टीस्ट होण्याचा मानस असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.