हल्ली इंटरनेट यंत्रणा अधिकाधिक असुरक्षित बनत चालली आहे. जे कोणी इंटरनेट युजर्स आहेत, त्यांनी त्यांच्या ईमेलचा पासवर्ड आता दर 2-3 दिवसांनी बदलणे अनिवार्य बनले आहे. कारण तुमच्या अकाऊंटवर कधीही हल्ला होऊ शकतो. जगभरातील सुमारे 56 कोटी इंटरनेट युजर्सचा ईमेलचा पासवर्ड लिक करण्यात आला असून त्यांची माहितीही घेण्यात आली आहे.
याआधी लिक करण्यात आलेल्या डेटा हा लिंकींग, ड्रापबॉक्स, लास्टएफएम, मायस्पेस, अॅडोब, नेओपेटस यांसह अन्य साईटचाही सामावेश आहे. यांमधील काही डेटा बरीच वर्षे आधी चोरला होता. जर यूजर्स त्यांचे पासवर्ड अकाऊंट सुरू केल्यापासून कधीच बदलला नसेल, तर मात्र अशा युजर्ससाठी ही धोक्याची घंटा आहे. याचा थेट अर्थ असा निघतो की, त्या युजर्सचा पासवर्ड आणि वैयक्तीक माहिती लगेच लिक होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमचा ईमल सुरक्षित आहे का, हे पडताळायचे असेल, तर तुम्ही https://haveibeenpwned.com/या वेबसाईटला जाऊन त्यात आपला ईमेल टाकून चेक करू शकता.