नवी दिल्ली । गुगलतर्फे दर दिवशी त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन डूडल बनविले जाते. आजही गुगलने फादर्स डे निमित्त अशाचप्रकारचे अनोखे डूडल बनवून आपल्या वापरकर्त्यांना खूश केले आहे.
जगभरात साजर्या केल्या जाणार्या फादर्स डेनिमित्त बनविलेले हे मार्मिक डूडल चर्चेचा विषय ठरत आहे. या डूडलमध्ये गुगलने 6 कार्टूनचा वापर करत एक अतिशय समर्पक डूडल बनवत आपली कल्पनाशक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. वडिल आपल्या मुलाला लहान-लहान गोष्टी शिकवत, त्याच्यावर संस्कार करत कशा पद्धतीने वाढवतात हेच या चित्रांतून दाखविण्यात आले आहे. जगभरात जवळपास 70 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात असून यानिमित्ताने वडिलांसाठी मुले वेगवेगळे प्लॅन्स बनवतात. यामध्ये वडिलांना लंच किंवा डिनरला घेऊन जात, गिफ्ट देत हा दिवस साजरा केला जातो.