जडेजाचा धमाका, एका ओव्हरमध्ये लगावले 6 षटकार

0

राजकोट । भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये जामनग आणि अमरेलीदरम्यान झालेल्या टी-20 सामन्यात जबरदस्त प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. जामनगरकडून खेळणार्‍या जडेजाने एका षटकांत सहा षटकार ठोकले. इतकंच नव्हे, तर 69 चेंडूत त्याने 154 धावा तडकावल्या. जडेजाने 10व्या ओव्हरमध्ये खेळण्यास सुरुवात केली. 15व्या षटकांत त्याने 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले. दमदार प्रदर्शन करताना त्याने 10 षटकार आणि 15 चौकारांच्या जोरावर 154 धावा चोपल्या. अमरेली संघासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान होते. हे आव्हान अमरेली संघाला पूर्ण करता आले नाही आणि 5 विकेट गमावत 118 धावांवर त्यांचा डाव आटोपला. जडेजाच्या 154 धावांच्या जोरावर जामनगर संघाला विजय मिळवता आला.