जडेजाचा भाजपला पाठींबा !

0

मुंबई : भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाचे संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रीय आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिवाबानंतर रवींद्र जडेजाचे वडील आणि बहिण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर ही काही तासातच रवींद्र जडेजा याने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे. लोकसभा निवडणुकीत जडेजाने भाजपचे कमळाचे चिन्ह ट्विट केला आहे. जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पत्नीला टॅग देखील केले आहे.

जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने जामनगरमधून निवडणूक लढवण्याच्या इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाने या ठिकाणी विद्यमान खासदार पूनम माडम यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण जडेजाचे कुटुंब राजकारणामुळे वाटले गले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकपमध्ये टीममध्ये जडेजाला जागा मिळाली आहे. टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर तीन तासात जडेजाने आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला पाठिंबा दिला. सोशल मीडियावर यामुळे जडेजावर टीका देखील होत आहे. गुजरातमध्ये सर्व २६ मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे.