जडेजाच्या सामना करणे अविश्वसनीय होते : पीटर

0

धरमशाला । तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी सर्वोत्तम गोलंदाज यांचा समाना करणे हे अविश्वसनीय होते.त्यातच जडेजाच्या उजव्या यष्टीबाहेर जाणार्‍या चेडूचा सामना केला तो अविश्वसनीय होता असे मत भारता विरूध्दची तिसरी कसोटी अनिर्णीत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोंब म्हणाला.ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोंबने आतापर्यंत जेथे खेळलो त्यात रांची येथील परिस्थिती खूप कठीण होती, असे सांगितले.

प्रदीर्घ वेळेपर्यंत फलंदाजी करणे सुरेख होते
या कसोटीत पीटर हँड्सकोंबने नाबाद 72 धावांची खेळी केली होती.अंतिम दिवशी 2 बाद 23 या धावसंख्येवरून प्रारंभ करून पराभव टाळण्यासाठी 129 धावांची गरज होती. सकाळच्या सत्रात आणखी दोन फलंदाज गमविले, परंतु तरीदेखील ते पीटर हँड्सकोंब आणि शॉन मार्श (53) यांच्या शानदार भागीदारीने सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवू शकले. हँड्सकोंबने म्हटले, “मी जेथेही खेळलो तेथे रांचीत निश्चितरित्या परिस्थिती खडतर होती. जगातील दोन सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांसमोर पाचव्या दिवशी खेळपट्टीवर खेळणे निश्चितच कठीण होते आणि मी आणि मार्शने सुरेखरित्या संघाला संकटातून बाहेर काढले. विशेषत: शॉन. त्याने स्वत: जास्त वेळ रवींद्र जडेजाच्या उजव्या यष्टीबाहेर जाणार्‍या चेंडूंचा सामना केला तो अविश्वसनीय होता. कारण या गोलंदाजाविरुद्ध एवढ्या प्रदीर्घ वेळेपर्यंत फलंदाजी करणे सुरेख होते.”