जत तालुक्यात गारपीटीचा हाहाकार

0

सांगली : जिल्ह्यातील नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा म्हणजे जत तालुका. गुरुवारी वादळी पावसाने या तालुक्याला झोडपून काढले. गारपीटीने तिथे हाहाकार माजवला आहे. यामुळे शेकडो एकर शेती उद्धवस्त झाली. यामध्ये द्राक्षबाग, डाळींब आणि मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे रामपूर, बागेवाडी, कंठी, येळदरी, मल्हाळसह परिसरातील सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील शेती उद्धवस्त झाली. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागा, डाळींब, मका आणि हळद पिकांचे मोठे नुकसान झाले. अनके ठिकाणी द्राक्षबागा या वादळी गारपीटीमुळे जमीनदोस्त झाल्या. अनेक घरांचे पत्रे उडून गेले, काही घरांची पडझड झाली आहे.