निष्क्रीय सत्ताधार्यांचा जगन सोनवणे यांनी केला निषेध ; जनआधारच्या नगरसेवकांना बांगड्या भरण्याचा सल्ला
भुसावळ : पालिकेतील सत्ताधारी निष्क्रीय आहेत, त्यांना गोरगरीबांच्या झोपड्यांशी देणे-घेणे नाही, मतांचा जोगवा त्यांना केवळ निवडणुकीत आठवतो त्यामुळे गोरगरीबांना पर्यायी जागा देण्यासाठी पालिका सभागृहात कुठलाही ठराव करण्यात न आल्याने नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी प्रांताधिकारी कार्यायलाबाहेर प्रसिद्धी माध्यमांना दिली.
ज्या सजीवांच्या जीवावर हे सत्ताधारी निवडून आले त्यांना गरीबांच्या भावनांशी देणे घेणे नाही मात्र निर्जीव वस्तूंचा पालिकेच्या अजेंड्यावर समावेश केल्याने त्यांनी निषेध करीत तीव्र संताप व्यक्त केला.