जनआरोग्य योजना लागू करण्याची मागणी

0

रावेर। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षा निमित्त राज्य शासनाने नावात बदल करुन महात्मा फुले जनआरोग्य योजना नामकरण केले. राज्य शासनाने 7 जून 2016 रोजीच्या मंत्री मंडळ बैठकीत निर्णयानुसार महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी वर्षानिमित्त महात्मा फुले जनआरोग्य योजना असे नामकरण केले होते. 21 नोव्हेंबर 2016 पासून सुरू होणारी ही योजना महात्मा फुले यांच्या जन्मदिनी अंमलात येईल अशी अपेक्षा होती मात्र हि योजना अद्यापही लागू झालेली नसून ती लागू करण्याची मागणी खांदेश माळी महासंघातर्फे करण्यात आली आहे.

योजनेत वाढीव तरतुदींचा समावेश करावा
यासंदर्भात माळी महासंघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून यात नमूद करण्यात आले की, शासनातर्फे हि नविन योजनार हि महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी लागू करुन आरोग्य पत्र लाभार्थी कुटूंबाला वाटप होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे न होता जूनी योजना ही आहे त्या स्वरूपात लागू आहे. फक्त योजनेचे नामकरण करण्याचा प्रयत्न केलेले आहे. मात्र अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तरी राज्यातील हजारो गरजू रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना वाढीव तरतूदीनुसार त्वरीत लागू करावी. तसेच या योजनेचे आरोग्यपत्र वाटप करावी व गरजू रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य संचालक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यांना रवाना केल्या आहेत. या निवेदनाव्दारे खान्देश माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला महाजन, कांतीलाल महाजन, रामकृष्ण महाजन, श्रीराम महाजन, एन.आर. महाजन, एस.केल महाजन, प्र.ला. मानकर, प्रकाश महाजन, मनोहर महाजन, अतुल महाजन आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.