जनकल्याण पतसंस्था शिरपूरची वार्षिक सभा उत्साहात

0

शिरपूर। जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिरपूर जि.धुळे या पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री बाबुराव वैद्य मार्केटच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेस पतसंस्थेचे सभासद यांची लक्षणीय उपस्थिती होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजयसिंग जामसिंग पाटील होते. रमेश महाजन यांनी अहवाल वाचन केले. पतसंस्थेचे 31 मार्च 2017 अखेर अधिकृत भागभांडवल 50 लाख रुपये तर वसुल भागभांडवल 38 लाख 22 हजार, ठेवी 3 कोटी 90 लाख रुपये व कर्ज वाटप 3 कोटी 57 लाख आहेत तर थकबाकीचे प्रमाण 1 टक्केपेक्षा कमी आहे. जनकल्याण पतसंस्थेच्या सभासदांचा पाल्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम हे सभेचे दरवर्षी चे वैशिष्टे असते.

यावर्षी सुध्दा पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. इयत्ता 10वींत 96 टक्के मिळविणारा केतन नेतेंद्रसिंग राजपुत याच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व 75 टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्याथ्यार्ंना भविष्यासाठी प्रोत्साहित करण्यात येवून बक्षीस वाटप करण्यात आले. संस्थापक दिलीप जयराम लोहार यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
पतसंस्थेचे चेअरमन विजयसिंग जामसिंग पाटील, किशोर उखा ठाकरे, साहेबराव दौलत बडगुजर, सुनिल राजाराम बारी, अधिकार रामराव माळी, जी.डी.महाले, सुनिल सोमा चौधरी, दिलीप खेमचंद चौधरी, कविता संजय भामरे, रमेश उखाजी महाजन आदी उपस्थित होते. तसेच पतसंस्थचे कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी कामकाज पाहिले.