जनकल्याण महाआरोग्य शिबिराचा 550 जणांना लाभ

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी विधानसभा शिवसेनेचे युवा अधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या ’जनकल्याण महाआरोग्य शिबिरा’चा 550 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. निगडी, प्राधिकरण येथील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात अमित गावडे मित्र परिवार आणि स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. स्टार हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद खोबडे, डॉ. विश्वजित पवार यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात हृदयरोग शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जिओप्लास्टी, हृदयविकार, शिरा, धमनी, रक्तवाहिन्या यांची गुंतागुंत, न्युरो शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यांची शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, मुत्रपिंड विकार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कानाची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका शर्मिला बाबर, कामगार नेते प्रकाश ढवळे, राजू बाबर, अनुप मोरे, शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल निकम, विकास भिसे, शाखाप्रमुख रवी पवार, शरद जगदाळे, पार्थ गुरव, निखिल पांढारकर यांच्यासह निगडी प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नगरसेवक अमित गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.