डॉ.कुंदन फेगडे ; डोंगरकठोर्यात हिवाळी शिबिरात मार्गदर्शन
यावल- देशात नेत्राची मागणी असलेले रुग्ण सुमारे साडे तीन लाखाहून अधिक असून केवळ जनजागृतीअभावी वर्षाकाठी 50 ते 60 हजारच नेत्रदान करण्यात देशातून नागरीक पुढे येतात. ही प्रचंड तफावत नेत्रदान बाबतीत जनजागृती अभावी उद्धभवते तेव्हा प्रत्येकाने नेत्रदाना संदर्भात जनजागृती करण्याकरीता पुढाकार घेतला पाहिजे. त्यात विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदान संदर्भातील महत्त्व समजून घेत ते आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या परीसरात प्रबोधन करावे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. ते डोंगरकठोरा येथे भुसावळ येथील श्रीमती कोटेच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते.
नेत्रदानाने चार जणांना मिळते दृष्टी
सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित भुसावळ येथील श्रीमती पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर डोंगरकठोरा येथे एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात सुरू आहे. या शिबीरात नेत्रदान, ‘जनजागृती आणि समाज’ या विषयावर आश्रय फाऊडेंशनचेे अध्यक्ष नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांचे व्याख्यान झाले. डॉ.फेगडे यांनी विद्यार्थिनींना नेत्रदान कोण करू शकतो, या संदर्भातील सखोल माहिती दिली. नेत्रदान करण्याकरिता हेल्पलाइन नंबर 1919 वर कशा पद्धतीने कॉल करावा व नेत्रपेढीशी थेट संपर्क कसा करू शकतो. याची माहिती दिली. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान केले गेले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेवुन समाजात नेत्रदान संबंधी असलेली अंधश्रद्धा दूर करायची आहे. त्यासाठी जनजागृतीची एकमेव माध्यम आहे. एका जणाच्या नेत्रदानाने चार जणांना दृष्टिदान देता येऊ शकतो म्हणून अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व आपले सदैव राहावे, आपल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्यांना कुणीतरी बघावे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षस्थानी हेमांशी चौधरी तर प्रमुख उपस्थितीत पत्रकार शेखर पटेल, प्रा.डॉ.सोपान बोराटे, प्रा. डॉ.हेमंत नारखेडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजश्री न्हायदे हिने तर आभार संध्या भावसार हिने मानले. यशस्वीते साठी रासेेयोच्या कार्यक्रम अधिकारी माधुरी भुतडा, सहाय्यक डॉ. शुभांगी राठी, पपीता धांडे सह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
सोशल नेटवर्कवर डोळा गाजला
सोशल नेटवर्कचा वापर करतांना आपण तो काळजी पुर्वक केला पाहिजे नुकतेच हमीद अन्सारी हा तरूण फेसबुक वर एका पाकिस्तानी तरूणीच्या प्रेमात पडून, सहा वर्ष पाकीस्तान तुरूंगात काढून देशात आला. सोशल नेटवर्कवर दक्षिणार्थ अभिनेत्री प्रिया व काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मारलेला डोळा खुप गाजला मा, नेत्रदाना विषय सोशल नेेटवर्कवर जनजागृती कुठे दिसत नाही. तेव्हा आपण सोशल नेटवर्क वापरतांना कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत पत्रकार शेखर पटेल यांनी सखोल मार्गदर्शन केले.