जनजागृतीसाठी अमळनेरात 7 रोजी नेत्रचेतना रॅलीचे आयोजन

0

अमळनेर । गेल्या अनेक दिवसांपासून जळगावात सुरू असलेल्या नेत्रदान संदर्भात जनजागृती करणार्‍या केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपिढीने अमळनेरात काढण्यात येणार्‍या नेत्रचेतना रॅली संदर्भात येथील मंगळग्रह मंदिरात शुक्रवार रोजी चर्चात्मक बैठक घेतली. यात 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेला या रॅलीची सुरुवात स्वामी नारायण मंदिर, सुभाष चौक, कारंज्या चौक, बसस्टँड व जि.प. विश्राम गृह येथे समारोप होणार आहे. असे शहरातील मंगलदेव ग्रह सेवा संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब व माझं गाव माझं अमळनेर यांच्याचर्चे अंती ठरविण्यात आले.

यांची होती उपस्थित
यासाठी मांगीलालजी बाफना नेत्र पिढीचे कृणाल महाजन, राजश्री डोलारे, समाधान चौधरी, अमळनेर नेत्रदूत भटेश्वर वाणी, मुख्यमंत्र्यांच्या अनुलोम प्रकल्पाचे संजय कोळी, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू महाले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय केले. प्रभारी सचिव महेश पाटील, माझं गाव माझं अमळनेरचे ग्रुप ऍडमिन सुनील भामरे, डॉ. युसूफ पटेल, डॉ. मिलिंद नवसारीकर, राजेंद्र निकुंभ, महावीर पहाडे, नीरज अग्रवाल, शेखर पाटील, चेतन जैन, राजेंद्र निकुंभ, भटू अग्रवाल, प्रदीप जैन, प्रशांत सिंघवी, सौरभ जैन, राजगुरू महाजन उपस्थित होते.