वरणगाव। पारंपारीक गीत गायन व घरगुती कार्यक्रमातून वरणगाव येथील संध्या भजनी मंडळ सामाजीक प्रबोधन करत असतात. या कार्यक्रमातून नव्या पीढीचा पारंपारीक कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले जाते. या कार्यक्रमाची दखल घेवून मुक्ताईनगर येथील ओम साई सेवा फाऊंडेशनच्या वतीने समाज सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सामाजीक उपक्रमांची घेतली दखल
वरणगाव येथील संध्या भजनी मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील यांनी महिलांना एकत्र करून मंदिरामध्ये भजनांचा कार्यक्रम करत असत. या कार्यक्रमाला वेगळे रूप देवून तंत्रज्ञानात अडकलेले व एकत्र कुटुंब पध्दतीपासून दुरावलेल्या समाजाला पारंपारीक कार्यक्रम, गीत यांचे ओळख व्हावी या दुष्टीकोनातून बाळाचे बारसे, घरातील मंगलमय प्रसंग, वाढदिवस, अथवा मयत झालेल्या कुटुबांतील शोक सभेवेळी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सामाजी रूप देण्यासाठी या पारंपारीक गीतासोबतच, घरातील चांगले संस्काराचे महत्व, वृक्षारोपणाचे महत्व, पाणी अडवा पाणी जिरवा, एकत्र कुटुंब पध्दतीचे महत्व, आई वडीलांचे घरातील असलेले महत्व, स्वच्छ अभियान यासह इतर सामाजीक उपक्रमांची दखल घेवून अशा विविध प्रसंगी यावर प्रबोधन केले जात आहे. या महिलांनाच्या चांगल्या उपक्रमाला बळ मिळावे यासाठी मुक्ताईनगर येथील ओम साई फाऊंडेशनच्या वतीने समाज सेवा पुरस्कार देवून या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी पुणे येथील सामाजीक प्रबोधनकार यशवंत बैरागी, आंबजोगाई येथील बालप्रबोधनकार शिवतेज अतुल शेणगे यांच्या उपस्थितीत उत्कुष्ट समाज कार्य गौरव पुरस्कार कविता सनान्से, दुर्गा सुरपाटणे, वनिता सुरपाटणे,संगीता बडगुजर, सरिता पाटील, सोनाली सनान्से, अनिता बडगुजर यांच्या हस्ते देण्यात आले. या मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील, वैशाली पाटील, राजश्री मुजुमदार, मनिषा जोशी, वैशाली पाटील, राजश्री शिंगार, अरीना बैरागी, यांच्यासह इतर महिलांचा सामावेश आहे.