जळगाव। केशवस्मृती सेवासंस्था समूहाचा भाग असलेल्या जळगाव जनता इन्फोटेकद्वारे विकसित ‘वेबवेस्ड कोअर बँकिंग सोल्युशन’ महाराष्ट्राबाहेर ही कार्यान्वित करण्यात येत आहे. सर्व बँकांना उत्तम ग्राहकाभिमुख सेवा देण्याकरिता हे सॉफ्टवेअर महत्त्वाचे असून सेवा आणि बँक कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याकरिता जेजेआयटीचे पुणे आणि जळगाव शाखेतील दहा सहकारी आसाममधील गुवाहाटी येथे रवाना झाले आहे.
जेजेआयटी गेल्या वीस वर्षापासून विविध बँकांना बहुउपयोगी सॉफ्टवेअर आणि कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे अविरत कार्य करीत आहे. गुवाहाटी येथे रवाना होणार्या सहकार्यांना शुभेच्छा देण्याकरिता केशवस्मृती प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष कांतीलाल बडाले, जेजेआयटीचे सरव्यवस्थापक संजय कुलकर्णी, व्यवस्थापक विवेक ओगले आदी उपस्थित होते.