भुसावळ : जनता की अदालततर्फे विविध न्याय मागण्यांसाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील मांडवेदिगर गावातील आदिवासी, वनवासी आदी नागरीकांना मतदान कार्ड, पिवळे कार्ड मिळावे, समस्या सुटाव्यात, भुसावळ शहराला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ म्हणून मान्यता मिळावी, भुसावळ शहराला जिल्हा घोषीत करावा यासह 15 न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष महादेव बोंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिल्हा संघटक गिरीश डोलारे आदींनी एका पत्रकान्वये कळवले आहे.