जनता दल अध्यक्षपदाची निवड

0

मुंबई – जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाच्या अध्यक्षपदी माजी आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. शरद पाटील यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. पांडुरंग ढोले यांच्या आकस्मिक निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षाचे राज्य पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष आणि राज्य मंडळ सदस्य यांच्या झालेल्या बैठकीत एकमताने प्रा. शरद पाटील यांची अध्यक्षपदी निवड आली. मनवेल तुस्कानो यांनी रितसर निवड झाल्याची घोषणा केली.