जनतेची आर्थिक लूट थांबवा !

0

नंदुरबार । इंधनदरवाढ सातत्याने होत असून यामुळे सामान्य जनतेचे जीवन असहाय्य झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे महागाई वाढणार असून केंद्र सरकार इंधनदरवाढ रोखण्यात अपयशी ठरली आहे. मात्र, सरकारने ही दरवाढ नियंत्रिक करावी, सरकारने जनतेची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. यात नंदुरबारात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.

शेतकर्‍यांना आर्थिक फटका
तळोदा । माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सरकारवर टीका करत प्रांत अधिकारी विनय गौडा याना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने सातत्याने पेट्रोल, डिझेल च्या किमती वाढवीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या दरवाढीमुळे प्रवासी भाडे देखील भरमसाट वाढले आहे. त्याच बरोबर शेतीउपयोगी यंत्रावरील खर्चही वाढल्यामुळे शेतकरींना आर्थिक फटका बसत असल्याचे म्हटले आहे.

आमदार कार्यालयापासून रॅली
नंदुरबार । पेट्रोल, डिझेलमध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ वाढ केल्याच्या निषेधार्थ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आमदार कार्यालय येथून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली जि.प चे बांधकाम सभापती दत्तु चौरे, बाजार समिती सभापती भरत पाटील, माजी सभापती डॉ. सयाजी मोरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश भैया परदेशी, कुणाल वसावे, नगरसेवक, येशवर्धन रघुवंशी, नगरसेवक,रविंद्र पवार, नगरसेवक मोहीतसिंग राजपूत, नगरसेवक कैलास पाटील नगरसेवक राजु माळी, शेतकी संघाचे सभापती बी. के. पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘या फेकु सरकारचे करायचं काय, खाली डोके वरती पाय मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोटारसायकल बैलगाडीवर ठेवून आमदार कार्यालयापासून माणिक चौक, हाटदरवाजा मार्ग तहसील कार्यालय येथे रॅली धडकली. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
निवेदन माजीमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्षा रोहिदास पाडावी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, जितेंद्र माळी, संदीप परदेशी,प्रकाश ठाकरे, पंकज राणे, बापू कळाल, रईस अली, अरविंद मगरे, योगेश पाडावी आदींसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

काँग्रेसच्या काळात दरवाढ स्थीर
वास्तविक कांग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल 130 रुपये होते. तरी सुद्धा सरकारने सामान्य जनतेचा विचार करून इंधन दरवाढ स्थीर ठेवली होती. या उलट सध्या अंतर राष्ट्रीय बाजार पेठेत क्रूड तेल 60 रुपये असताना सरकार अन्याय कारक पणे किमती वाढवून सामान्य जनतेचे जीवन असह्य केले आहे.सरकारने इंधन दरवाढ नियंत्रीत करून त्यावर जी एस टी लागू करावी, घरघुती गॅस, पेट्रोल, डिझेल यावर अनुदान लागू करावे, उद्योग पतींना झुकते माप देऊन लोकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी तळोद्यात करण्यात आली.