मुक्ताईनगर । जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर- निमखेडी बु. गटामधून अनुसुचित जमातीसाठी नितीन प्रल्हाद कांडेलकर हे शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर लढत असून शिवसेनेचे धोरण व्रत सेवेचे ध्येय ग्रामविकासाचे यानुसार तळागाळापर्यंत पोहचून गोरगरीबांचे कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या गटाअंतर्गत येणारी गावे मुक्ताईनगर, पिंप्रीआकारऊत, सुकळी, दुई, सोमनगाव, डोलारखेडा, वायला, टाकळी, चिंचखेडा बु. महालखेडा, ईच्छापूर, निमखेडी, चारठाणा, मधापुरी, नांदवेल या गावांच्या विकासाच्या दृष्टीने शहर व गाव अंतर्गत रस्ते दुरुस्ती करणे, शेती रस्ते बनविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांना योग्य सुविधा पोहचविणे, शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडविणे व विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळवून देणार, समाजकल्याण विभागामार्फत मिळणार्या योजनेचा लाभ गरीबांपर्यंत पोहचविणे, शहर व गावातील गटारींचे व्यवस्थापन करणे, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुध्द जल योजना व शौचालयाची व्यवस्था करुन देणे या कामांना प्राधान्य दिले जाईल.
जनतेचे काम करण्यास कटिबद्ध
अनुसुचित जमातीचे आरक्षण असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिल्याने जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मुक्ताईनगर- निमखेडी बु. या गटाची सेवा करण्यासाठी संधी दिली तर मी एक दिलाने जनतेचे काम करण्यास तत्पर राहिल. या आधी मी शिवसेनाचा एक शिपाई म्हणून जनतेचे काम केले आहे. व मी कटिबध्द राहील. या गटातील विविध कामे रखडलेली आहेत. त्यांचा पाठपुरावा करुन हे कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या गटात गटातटाचे राजकारण होत असून सामान्य जनतेला वेठीस धरुन खच्चीकरण केले जात आहे. सर्वसामान्य जनतेचे काम व्हावे यासाठी मी उमेदवारी स्विकारली आहे.
गटासाठी करणार असणारी कामे
मुक्ताईनगर, पिंप्रीआक्राऊत, सुकळी, दुई, सोमनगाव, डोलारखेडा, वायला, टाकळी, चिंचखेडा बु. महालखेडा, ईच्छापूर, निमखेडी, चारठाणा, मधापुरी, नांदवेल अंतर्गत येणारे रस्ते गटारी, शाळांची वालकंपाऊंड दुरुस्ती, शुध्द पाणी पुरवठा, आरोग्य संदर्भातील योजना, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुध्दजल योजना व शौचालयाची सुविधा करणे याकडे विशेष लक्ष देऊन कामाची गती वाढविणार आहे.