जनतेला सत्तेचा उन्माद पसंती पडला नाही: शरद पवार

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज गुरुवारी सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत, भुमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजप-सेनेवर जोरदार टीका केली. भाजप-सेनेला २२० जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती, मात्र जनतेने भाजप-सेनेला धक्का दिला आहे. जनतेला सत्तेचा उन्माद पसंती पडला नाही असे सांगत शरद पवारांनी भाजपला टोला लगावला.

जनतेने दिलेला कौला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विनम्रपणे स्वीकारत आहे.
आघाडीतील प्रत्येकाने एकमेकांसाठी मनापासून प्रामाणिकपणाने काम केले आहे असे शरद पवारांनी सांगितले.

साताऱ्यात राष्ट्रवादीने विजय संपादन केले आहे. स्वत: उदयनराजे यांनी गादीची गरिमा ठेवली नाही, असा टोला देखील भाजपला आणि उदयनराजे यांना टोला लगावला. श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळविला असल्याने मी स्वत: साताऱ्याला जाऊन जनतेचे आभार मानणार आहे असे शरद पवार यांनी सांगितले.