माजी आमदार शिरीष चौधरी : जनसंघर्ष यात्रेनिमित्त कार्यकर्ता सहविचार सभा
फैजपूर- जिल्ह्यात दुरवस्था झालेल्या काँग्रेस पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी ग्रामीण जनतेपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत जनता जुळणार नाही त्यासाठी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करा, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित कार्यकर्ता सहविचार सभेत फैजपूर येथे केले. फैजपूर येथून 2 ऑक्टोबर रोजी येणार्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांची सहविचार सभा बुधवारी झाली.
धनाजी नाना महाविद्यालयातील या कार्यशाळेला माजी आमदार चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
निवडणुका जिंकणार मात्र लोकांचे दुःख जाणणेही गरजेचे
माजी आमदार शिरीष चौधरी पुढे बोलताना म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय होईलच यात शंका नाही मात्र जनतेला काय दुःख आहे ते जाणून घेत नाही, त्यात सहभागी होत नाही तोपर्यंत लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत. त्यासाठी आपली शक्ती प्रभावी करण्याची गरज आहे व ग्रामीण जनतेला काँग्रेसशी जोडण्यासाठीच खास खर्या अर्थाने या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संघर्ष यात्रेमुळे पक्षाविषयी पारदर्शक वातावरण -माजी खासदार पाटील
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, या ऐतिहासिक संघर्ष यात्रेची जबाबदारी महत्वाची आहे. ही संघर्ष यात्रा यशस्वीरीत्या पार पाडून भारत देशात याचा संदेश पोहचवावा त्यामुळे पक्षासाठी पारदर्शक असे वातावरण तयार होणार आहे. या संघर्ष यात्रेसाठी राज्य पातळीवरील जवळपास दोनशे नेते येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी देऊन प्रत्येक गावात जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे तर आभार प्रभात चौधरी यांनी मानले. या बैठकीला रावेर, यावल तालुक्यासह जिल्हा स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप भैय्या पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, जळगांव महानगर अध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत विशवनाथ पाटील, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहंम्मद मुन्वर खान, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल मोरे, ज्येष्ठ पदाधिकारी शब्बीर शेठ, भगतसिंग पाटील, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चोपडा तालुकाध्यक्ष राजाराम पाटील आदी उपस्थित होते.