जनधन खाते परस्पर वर्ग केल्याबाबतचे निवेदन

0

नवापुर। नवापुर तालुक्यातील शेतकरी व घरकुल लाभार्थी, श्रावण बाळ वृध्दपकाळ योजना,सरकारी पेन्शन धारक, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी,इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी, पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी, शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी यांचे राष्ट्रीयकृत सर्व बँकामध्ये सर्वाचे बचत खाते उघडलेले आहे. परंतु सबंधीत खातेदाराना न विचारता जनधन खाते परस्पर वर्ग केल्याबाबतचे निवेदन आज पं.स गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना नवापुर तालुक्यातील असंख्य लाभार्थीनी दिले.नवापुर तालुक्यातील बर्‍याच लोकांचे खाजगी व्यवहरासाठी उघडण्यात आलेले खाते परस्पर बँकेने लाभार्थीना न कळविता किवा कुठलीही माहिती न देता जनधन खात्यात वर्ग केलेले आहे.

खात्यावर व्यवहार करण्यासाठी त्रास
बर्‍याच योजनांचे पैसे संबंधीत लाभार्थीच्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी त्रास होत आहे. याचा खुलासा करुन न्याय दयावा अन्यथा न्याय न मिळाल्यास़ संबंधीत राष्ट्रीयकृत बँक शाखावर मोर्चा काढुन आंदोलन करण्यात येईल व होणारे नुकसानास शासन जवाबदार राहील असे निवेदनामध्ये म्हटले आहे.निवेदनावर पं.स उपसभापती दिलीप गावीत, पं.स सदस्य जालमसिंग गावीत, सुरेश गावीत, नवलसिंग गावीत,विनायक गावीत,सरु गावीत,रमेश गावीत,अशोक गावीत, दिलीप गावीत,सुरज गावीत,राहुल गावीत,विकास गावीत यांचा सह्या आहेत,नवापूर तालुक्यातील असंख्य खातेदार यामुळे हैराण झाले असुन राष्टी्य बँकेचे अधिकारी मनमानी करत आहे. सध्या पावसाचे दिवस असुन शेतकरी ती कामे सोडुन बँकेत येतात. मात्र त्यांना बँकेचे कँशिअर व इतर व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांचा व्यवहार योग्य नसल्याच्या तक्रारी खातेदारांनी केल्या आहेत.