जनमानसात जाऊन भावना समजून घेतल्यानेच चांगला प्रतिसाद मिळाला: शरद पवार

0

मुंबई: महाराष्ट्राच्या निवडणुकीत विरोधक संपले असल्याची भावना भाजपने निर्माण केली होत. मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नव्हती, जनतेचे अनेक प्रश्न होते. सरकारबद्दल जनभावनेत नाराजी होती. ती भावना आम्ही ओळखली आणि जनमानसात जाऊन भावना समजून घेतली त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला मिळालेल्या यशाबाबत त्यांनी भाष्य केले. एका वृत्त वाहिनीवर त्यांनी मुलाखत दिले, त्यावेळी ते बोलत होते.

शेतकरी, कारखाने, उद्योग, रोजगाराचे प्रश्न असताना भाजपने ३७० आणि जवानाच्या कामगिरीवर राजकारण केले हे जनतेला पटले नाही त्यामुळेच भाजपला धक्का बसला असेही शरद पवार यांनी केले.

मतदान झाल्यानंतर ओपिनियन पोलमध्ये भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत दाखविण्यात आले, मात्र मला ओपिनियन पोलवर शंका होती आणि ती खरी ठरली. एकाही प्रसार माध्यमांचे ओपिनियन खरे ठरले नाही असे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील वास्तव्य मांडण्यात प्रसार माध्यमे अपयशी ठरली असे देखील शरद पवार यांनी सांगितले.