जळगाव: येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊंडेशन संस्थेच्यावतीने ‘जनशक्ति’चे उपसंपादक तथा जामनेरचे रहिवासी शरद प्रभाकर भालेराव यांना ‘भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पत्रकार’ पुरस्काराने नुकतेच जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमात सपत्नीक सन्मानित करण्यात आले. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील व मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प, सन्मानचिन्हासह सन्मानित करण्यात आले. त्यांना यापूर्वीही 2016 मध्ये जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे सन्मानित केले आहे. ते 2002 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.
याबद्दल ‘जनशक्ति’चे संपादक कुंदन ढाके, निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, माजी जलसंपदामंत्री तथा आ.गिरीश महाजन, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह सर्व पत्रकार बांधव, सुवर्णकार समाजातील समाज बांधवांसह आप्तेष्टांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.