स्वच्छतेच्या प्रश्नावर मनपात ठिय्या आंदोलन;शिवसेनेचा पाठिंबा
जळगाव– शहरात गेल्या काही दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. मात्र स्वच्छतेच्या प्रश्नावर रा÷ष्ट्रवादी काँग्रेस गप्प का? अशा आशयाचे वृत्त दैनिक ’जनशक्ति’मध्ये प्रसिध्द होताच राष्ट्रवादी काँग्रेसला जाग येवून त्यांनी स्वच्छतेच्या प्रश्नावर मनपात ठिय्या आंदोलन केले. यावेळी वॉटरग्रेसला दिलेला सफाईचा मक्ता विशेष महासभा घेवून रद्दचा ठराव करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान,राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिवसेनेने देखील पाठिंबा दिला.
जळगाव शहरातील सफाईचा मक्ता वाटरग्रेस कंपनीला सर्वांचा विरोध असताना देण्यात आला.त्यानंतर नियमितपणे मक्तेदारास कंत्राटातील अटींची पूर्तता करण्यास प्रशासनाकडून सूचना झाल्या होत्या,कारण त्यांच्या कडे पुरसे यंत्रणा नव्हती. त्याविषयी वेळोवेळी स्मरणपत्रे देखील मक्तेदारास दिले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून मक्तेदाराने कामबंद केल्याने शहरात सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना सारख्या भयानक आजाराने त्याचे तोंड वर काढून सायन्स ला आव्हान केले आहे.त्यामुळे स्वच्छता नागरिकांना मिळणे हे गरजेचे असताना कचर्याच्या साम्राज्यात जगावे लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले आहे. यावेळी गो..कचरा…गो.. वॉटरग्रेस..गो अशा घोषणा देण्यात आल्या.
महासभा न घेतल्यास मनपाला लावणार कुलूप
तीन दिवसांत जळगाव मनपा मध्ये विशेष महासभा घेऊन वाटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा ठराव करावा, आयुक्तानी व महापौर यांनी संयुक्तिक येवून महासभा घेण्याचा लेखी आश्वासन जनतेला द्यावे. महासभा न घेतल्यास जळगाव महानगरपालिकेस कुलूप लावून अभिनव पद्धतीने आंदोलन करणार व त्यास प्रशासन जबाबदार राहील. शहरातील रस्ते ,कचरा या मुलभूत समस्या मनपा व सत्ताधारी पुरवू शकत नाहीत तर नागरिकांनी महापालिकेस कर का भरवा ? हा प्रश्न या निमिताने उपस्थित होत आहे.किंवा तो कर मनपा ने माफ करावा. तसेच वाटरग्रेस कंपनीला पाठीशी कोण घालत आहेत ? त्यांच्या मागे कोणती धनशक्ती,राजनैतिक शक्ती असल्याचे सत्य जनते समोर आणावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मनपात ठिय्या आंदोलन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,अॅड.कुणाल पवार, कल्पना पाटील,मिनल पाटील, लता मोरे, रवी देशमुख, अक्षय वंजारी,गौरव वाणी,विशाल देशमुख,दुर्गेश पाटील,अकील पटेल,जयप्रकाश चांगरे,गजानन देशमुख,सत्यजीत नेमाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवेसनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, अमर जैन,नितीन बरडे,प्रशांत नाईक,बंटी जोशी,गजानन मालपूरे यांनी रा÷ष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.