जनशक्ति ब्रेकिंग ! विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग; 70 लाखांचे नुकसान

 

 

नवापूर (हेमंत पाटील) शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पहाटे पाचच्या सुमारास आग लागली आहे.आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.काही मिनिटात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीचे व धुराचे लोण वरपर्यंत जात होते. पहाटे आजूबाजूच्या नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे लोण जास्त असल्याने आग पसरत गेली व पूर्ण विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स सर्वच वस्तू जळून खाक झाले तसेच गोडाऊन मधील साहित्यदेखील जळाले आहे.

 

या आगीमध्ये 70-80 लाखाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मालक विजय सोनवणे यांनी दिली. दुकान आणि गोडाऊन एकाच ठिकाणी असल्याने मोठे नुकसान झाले आहे.30-40 फ्रिज,

10 एसी, 30 एलईडी टि व्ही, 250 फॅन,10 वॉशिंग मशीन, 40 साधी टि व्ही, होम थेटर, 50 आर्यन,इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे.गेला चार तासानंतर

 

आगीवर नियंत्रण मिळविता आले.. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने आग विझवण्यासाठी नवापुर नगरपालिकेचे चार बंब लागले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजारील गुजरात राज्यातील सोनगड नगर परिषद अग्निशामक दल व नंदुरबार नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी एकुण सहा बंब लागले. चार तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आले. प्रभागातील नगरसेवक खलील खाटीक व निलेश जयस्वाल यांनी थेट छतावर चढून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.तर शेजारील तोसिफ खाटीक, राहूल नगराळे यांनी घरातील मिळेल त्या साधनाने पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दरम्यान शहरातील वीज पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता.

 

 

नवापुर नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा 100 नंबर बंद असल्याने आग लागल्यावर संपर्क झाला नाही. थेट मालकाला फायर स्टेशनला अग्निशामक बंबा बोलवण्यासाठी जावे लागले. साधारणता उशीराने बंबा दाखल झाल्याने आग वाढल्याची माहिती मालकाने दिली.

आग विझविताना पालिकेचा भास्कर भालेराव कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे.सदर घटनेत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. नगरपालिकेने यापुढे अशी घटना घडू नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तहसीलदार मंदार कुलकर्णी,घटनास्थळी नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील,मुख्याधिकारी विनायक कोते.सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरिअक्शक मनोज पाटील,आदींसह घटनास्थळी भेट दिली