‘जनशक्ती’च्या दणक्यानंतर आयुक्तांनी पेट्रोल पंपाचे काम थांबवले

जळगाव ।Jalgaon Municipal Commissioner Satish Kulkarni ।  शहरातील शिवकॉलनी थांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गाला लागून प्रस्तावित रस्त्याच्या जागेत चक्क पेट्रोल पंपालाच महापालिकेने परवानगी दिल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्तांविरोधात तक्रार केली जाणार असल्याचे वृत्त जनशक्तीने प्रकाशित केले होते. याची दाखल घेत आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी स्वतः जाऊन हे काम बंद पडले.यावेळी स्थानिक नगरसेवक सचिन पाटील याठिकाणी उपस्थित होते.  

शिवकॉलनीतील गट क्रमांक 52/2 मधील प्लॉट क्रमांक 22 मध्ये सध्या पेट्रोल पंपाचे काम सुरू होते. या कामासंदर्भात 3 जानेवारी 2022 रोजी, शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले होते, की प्लॉट नं 22 व प्लॉट नं 5 मधून डी पी रोड जात असल्याने प्लॉट नं 22/2 या जागेवर पेट्रोल पंपाची परवानगी मनपा नगररचना विभागारकडून देण्यात आली आहे. ही परवानगी कोणत्या नियमात दिली आहे. याची चौकशी मनपा आयुक्तांनी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, हा पेट्रोल रस्त्याच्या जागेत असल्यास आयुक्त सतीश कुलकर्णी हे गोत्यात येण्याची शक्यता होती. मात्र बुधवारी स्वतः आयुक्तांनी जाऊन हे काम बंद करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी जाऊन याठिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे काम तातडीने बंद करावे असे आदेश दिले. व हे काम बंद ना केल्यास संबंधीत पेट्रोलपंप मालकावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावे असे आदेश दिले आहेत. अशी माहिती नगरसेवक सचिन पाटील यांनी दिली.