जनशक्ती ईनसाईड स्टोरी : एकनाथ शिंदे यांनी बंड केले नसते तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते

मुंबई (खास प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार यांनी बंड केलं, हे बंड झालं नसत तर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडून भाजप सरकार सत्तेत आलं असत. राज्यसभा निवडणूक नंतर सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू होतील याचे स्पस्ट संकेत मिळू लागले होते. शिवसेनेत व्यक्तिगत आमदारांना फोडणे अशक्य आहे , यासाठी नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अखेर एकनाथ शिंदे या आमदारांना सोबत घेऊन सुरतेला निघाले. गेल्या काही दिवसांत अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या मार्फत राष्ट्रवादी नव्हे पक्षातील स्वतःचा गट मजबूत आणि सक्षम केला. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेकांना खटकत होती आणि खटकत आहे. साधारण 35 आमदार असलेल्या गटाचे नेतृत्व अजित पवार करत आहेत. सतत पक्षात डावलले गेल्याची भूमिका अजित पवार यांना असह्य झाली आहे. हीच बाब भाजप अजित पवार यांच्या जवळीक येण्याची आहे.

अजित पवारांनाही भाषणापासून डावलले
राज्यसभा निवडणूक पूर्वी अजित पवार की एकनाथ शिंदे ? यावर निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन दिवसात तुम्ही नाही तर इतर येतील हा निर्णय एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. ही बाब पक्ष श्रेष्ठींना सांगूनही शिंदे यांच्या सर्व गोष्टीकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं. एकनाथ शिंदे यांनी निर्णय पक्का केला. शिंदेचा निर्णय आणि दिल्लीतील हालचाली. शिंदे यांंचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदि यांचा देहू येथे कार्यक्रम झाला. या तिन्ही कार्यक्रमात अजित पवार यांना पूर्णपणे डावलण्यात आलं. अजित पवार यांना योग्य संदेश देणे, राष्ट्रवादीचा डॅमेज कंट्रोल करणे हाच होता हे देखील गुपित राहील नाही. एकनाथ शिंदे हे 30 आमदारांना सोबत घेऊन गेले असले तरी त्यांच्या सोबत शिवसेनेचे कट्टर किती आहेत. हे एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहेत तर मातोश्री वर शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचे दोन मंत्री हजर आहेत.

वादावर पडदा टाकणे हा शिवसेनेसमोर एक पर्याय
सेना भाजप सरकार सत्तेत येणे हा होऊ शकतो. हे झालं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या चारही पक्षात मोठे पक्षांतर ठरलं आहे.

तर ईडीचा टळणार ससेमिरा
शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार ईडीच्या रडारवर आहेत. भाजप सोबत जाऊन ही टांगती तलवार काढणे त्यांना गरजेचे झालं आहे. पण पक्षप्रमुख यांनी या कडे साफ दुर्लक्ष केलं. गेल्या दीड महिन्यापासून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चे उद्योगपती नॉट रीचेबल आहेत तर शिंदे यांचे अनेक विश्वासूदेखील नॉट रीचेबल आहेत. हीच भीती शिंदे यांच्या डोक्यावर आली आहे.