जळगाव : स्वतःला हे शिवसैनिक म्हणवून हिंदूत्वाचा मुद्दा हे लोक पुढे करीत असलेतरी ही केवळ जनतेची फसवणूक आहे. हिंदूत्वच गाजवायचे होते तर माग अडीच वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत का गेले असा सवाल अमोल झांबरे यांनी उपस्थित केला आहे. अडीच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर हा खेळ मांडण्यात आला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे सारख्या महान व्यक्त या लोकांना कधीही माफ करणार नाही. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक तिकडे गेले असून त्यात जिल्ह्यातील आमदारांचाही समावेश आहे. जे खरे शिवसैनिक कार्यकर्ते आहे त्यांचा विचार न करता केवळ पैश्यांसाठी या लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. महाराष्ट्रीयन असल्याचा डंका वाजवतात मात्र गुजरात व गुवाहाटीत पळ काढतात ही बाब लोकशाहीसाठी घातकच आहे.