जनसंग्राम संघटनेतर्फे मुखवटा मोर्चा

0

जळगाव। जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये गेल्या 10 वर्षापासून अडकुन पडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करावी, अशी मागणी जनसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. जनसंग्राम संघटनेच्या वतीने विवेक ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील ठेवीदारांनी मुकवटा मोर्चा काढून जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. येत्या महिनाभरात गेल्या 7/8 महिन्यात झालेल्या कर्ज वसुलीतून पतसंस्था निहाय ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या रकमा तात्काळ अदा कराव्यात, असे न झाल्यास ठेवीदारांच्यावतीने आपल्या कार्यालयासमोर यापुढे प्रसंगी आत्मदहनाची परवानगी घेवून यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनात या आहेत मागण्या
जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये गेल्या 10 वर्षापासून ठेवी अडकुन पडल्यामुळे हैराण असलेले ठेवीदार आपणास आमच्या संघटनेच्यावतीने आज 1 ऑगस्ट 2017 रोजी मुखवटा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये गेल्या 10 वर्षापासून अडकून पडलेल्या ठेवीदारांचे प्रश्‍नांबाबत सहकार आयुक्त यांच्या बैठकीत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होवून ठेवी तात्काळ परत कराव्यात. झालेल्या बैठकीत आढावा सभेत दिलेल्या सुचनानुसार डिसेंबर 2017 पावेतो तयार केलेल्या कृती कार्यक्रमानुसार कर्ज वसुली होऊन वसुलीच्या प्रमाणात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 47 हजार कर्जदारांना पाठीशी घालणारे धोरण सहकार विभाग अवलंब करत असल्याचा आरोप यावेळी केला आहे.

खोटा मुखवटा बाजूला करा
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिसेंबर 2016 मधील बैठकीनंतर खुद मंत्री महोदयांनी सहा महिन्यात ठेवी न मिळाल्यास जोड्याने मारा असे जाहीर आवाहन केले होते. मंत्री महोदयांच्या या आवाहनाला सुद्धा सहकार विभागाच्या नाकर्तेपणामुळे आपसुकच तिलांजली मिळाली आहे. राज्य शासन सहकार व लेखा परिक्षण विभागाने कर्ज वसुली व ठेवींच्या निपटारा प्रकरणी धार केलेला खोटा मुखवटा तात्काळ बाजुला सारा व ठेवीदारांच्या हितासाठी कर्ज वसुलीचा कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा कार्यक्रम राबवावा, सहकार व लेखा परिक्षण विभाग यांनी गेल्या दहा वर्षापासून धारण केलेल्या खोट्या मुखवट्याचा निशेध म्हणून आज आमच्या संघटनेच्यावतीने सदरचा मुखवटा मोर्चा काढून निषेध करत जळगाव जिल्ह्यातील ठेवींप्रश्‍नी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आला आहे.