‘जनसंपर्क आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया’वर व्याख्यान

0

चिंचोलेकर आणि रनाळकर यांचे लाभले मार्गदर्शन

जळगाव । जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील बुधवार १३ सप्टेंबर रोजी ‘जनसंपर्क आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया’ या विषयावर मुंबई लोकमतचे शहर संपादक राहुल रनाळकर आणि सोलापुर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ चिंचोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना सांगितले की, प्रिंन्ट मीडीयामध्ये बेसिक पक्का होत असतो. लिखाण, वाचन, चिंतन आणि मनन हे प्रिंट मिडीयासाठी महत्वाचे असून एकदा पत्रकारितेत काम केल्यानंतर पर्याय म्हणून दुसरे काम करु शकत नाही.

जनसंपर्क कार्यशाळेचे आयोजन
प्रिंट मीडीयामध्ये बेसिक माहिती प्राप्त होत असल्याचे मान्यवरांकडून सुर निघाला. तर डॉ. चिंचोलेकर मार्गदर्शन करताना सांगितले की, जनसंपर्क म्हणजे पब्लिक रिलेशन, एखादा विशिष्ट संदर्भात पारश्‍व किंवा सातत्याने केलेला संवाद, पारश्‍व असलेली व्यक्तीशी सातत्याने केलेली प्रक्रिया, संस्था, आणि संस्थेशी निगडीत घटक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा अघ्यक्षस्थानी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम दौड होते. तर प्रास्ताविक सुधीर भटकर यांनी केले. प्रमुख पाहुण्याचे स्वागत योगेश पाटील आणि अभिलाष पारधे यांनी केले. तर सुत्रसंचालन रुचिता चौधरी तर आभार विशाल धनगर यांनी मानले.