जनसेवा हिच ईश्‍वरसेवा मानून कार्य करणार – संजय सावकारे

0

भुसावळः जनतेची सेवा हिच ईश्‍वरसेवा मानून यापुढेदेखील आपले कार्य निरंतर सुरू राहिल, अशी ग्वाही देत जनतेसह हितचिंतक, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी दिलेल्या शुभेच्छांनी आपण भारावलो असल्याचे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त करीत आभाराऐवजी सर्वांच्या ऋणातच राहू, असे सत्कारप्रसंगी सांगितले. सोमवारी सावकारे यांचा वाढदिवस असल्याने दिवसभरात त्यांनी विविध कार्यक्रमांनी हजेरी दिली तर कार्यकर्त्यांनी गराडा घालत सत्कार केला. भुसावळ भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष करण यादव यांनीही त्यांचा सत्कार केला. भाजपाचे अभ्यासू नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांनीही त्यांचा सहृदय सत्कार केला.