हडपसर । शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे आणि शाळा हे माध्यम अधिक सक्षम, सशक्त आणि प्रयोगशील बनवण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे नमूद करत नगरसेवक मारुती तुपे यांनी आपल्या सर्वस्पर्शी सर्वसमावेशक कार्याने शहरात आदर्श प्रभाग साकारला आहे. या सर्वच जनहितकारी प्रकल्पांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे नमूद करत सर्वतोपरी सहकार्याची शाश्वती गिरीश बापट यांनी दिली.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देत वृक्षारोपण
स्थायी समिती सदस्य मारुती तुपे यांच्या प्रयत्नांतून व स्थानिक निधीतून प्रभागात अद्ययावत ई लर्निंग स्कूल इमारतीचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी पुणे पालकमंत्री नामदार गिरीश बापट यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी पर्यावरणपूरकतेचा संदेश देत बापट यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्येची देवता सरस्वती व छत्रपती शिवराय यांचे प्रतिमेचे पूजन करून, नियोजित शालेय इमारतीची पूजाविधीने भूमिपूजन संपन्न झाले.
अनिकेत सुर्वे यांचा सत्कार
यावेळी योगेश ससाणे, नगरसेविका वैशाली बनकर, भूषण तुपे, सुकन्या गायकवाड, रवी तुपे, माऊली कुडले, संजय पारिख, अमित गायकवाड, संकेत झेंडे, उद्योजक अशोक तुपे, कुणाल चौरे, राजेंद्र बढे, राहुल धेंडे, संदीप चव्हाण, सुलभा कांबळी, स्मिता गायकवाड उपस्थित होते. अनिकेत सुर्वे यांचा कार्यकर्तृत्वाबद्दल विशेष सत्कार बापट यांच्या हस्ते करण्यात आला.
समस्यांबाबत जाण
आपल्या निस्सीम जनसेवेचा वसा कायम ठेवत ते करीत असलेले लोकहितकारी कार्य व स्थानिक निधीतून जनसामान्यांच्या मूलभूत गरजा, समस्या निराकरण, नानाविध उपक्रम तसेच ई लर्निंग स्कूल, सुसज्ज प्राथमिक दवाखाना, अग्निशामक केंद्र व प्रभागातील गरजुंच्या सेवेसाठी रुग्णवाहिका हे प्रकल्प, यांचे नियोजन म्हणजे एक कुशल, अभ्यासू व नागरिकांच्या सर्व समस्यांबाबत जाण असण्याचे द्योतक असल्याचे बापट यांनी तुपे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले. त्यांनी नागरी समस्यांबरोबरच प्रभागाचा विकास करताना दूरदृष्टी बाळगली आहे.
नागरिकांना शिधापत्रिकाचे वाटप
यावेळी नागरिकांना शिधापत्रिका वाटपही करण्यात आले, तर विशेष कार्यकारी आधिकारीपदी नियुक्ती झालेल्या मान्यवरांस नियुक्ती पत्र देत गौरविण्यात आले. हडपसर परिसरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.