वरखेडी ता. पाचोरा । केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनविकासाच्या व जनहिताच्या योजना राबवित असून भाजप निवडणूकीत मतदानासाठी प्रलोभने किंवा आश्वासने देण्याचे राजकारण करत नसून जनहिताच्या कामातून शेवटच्या गरीब, वंचित उपेक्षित घटकापर्यंत योजना पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. संसद ते ग्रामपंचायतपर्यंत विकास गंगा पोहचविण्यासाठी व विकासाच्या मागे उभे राहण्यासाठी जनतेने भाजपाच्या पाठीशी राहून पक्ष ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केले. ते जि.प. व पं.स. निवडणुकी संदर्भात कुर्हाड गटात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठक वरखेडी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी बोलत होते. सदरील बैठक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाने इच्छुकांची संख्या अधिक
लोहारा- कुर्हाड गटातील बहुसंख्य गावे ही जामनेर विधानसभा मतदार संघात असून वरखेडी सह परिसरातील सहा गावे पाचोरा मतदार संघात आहे. लोहारा कुर्हाड गटातील गावे हे ना. गिरीश महाजन यांच्या मतदार संघात असल्याने विशेष महत्वाचे आहे. जि.प. गट सर्वसाधारण महिला राखीव असून पं.स. गण ओ.बी.सी. महिला राखीव तर कुर्हाड पं.स. गण सर्वसाधारण राखीव आहे. या गटाचे नेतृत्व जलसंपदामंत्री हे करीत असल्याने इच्छुक उमेदवारी मागणार्यांची संख्या जास्त आहे. तसेच पाचोरा पं.स. चे सभापती पद हे सर्वसाधारण आहे म्हणून कुर्हाड गणातून आपापले नशिब आजमाविण्यासाठी बरीच कार्यकर्ते उत्सुक आहे.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला कुर्हाड, लासुरे, भोकरी, वरखेडी गटातील व गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, स्वीकृत नगरसेवक शांताराम पाटील, शरद अन्नासोनार, उस्मान अमीर, चंद्रकांत पाटील, संतोष चौधरी, किरण पाटील, रफिक काकर, सुदाम देवरे, डॉ. विकास पाटील,
डॉ. धनराज पाटील, गणेश गोसावी, बाबु काकर, रविशंकर पांडे, प्रेमराज देवरे, दीपक बागुल, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रविशंकर पांडे यांनी तर आभार शरद सोनज यांनी केले.