तळोदा। जनार्दन महाराज हे सातपुड्यातील कर्मयोगी होते. त्याच्या दूरदृष्टीकोनातून सातपुड्यात विकासाची गंगा पोहचू शकली. सापुड्यातील शैक्षणिक व सामाजिक विकासाची मुळे ही महाराजांच्या कार्यात रोवली गेली, असे प्रतिपादन धडगांव येथील कनिष्ठ महाविद्यालायचे प्राचार्य प्रा.आर.यु.लांबोळे यांनी केले. आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा माजी आमदार कै जनार्दन वळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त धडगांव येथील एस व्ही ठकार कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या कार्याला उजाळा
कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावर प्रा.रवी ठाकरे, प्रा.रमेश वसावे, प्रा.शरद पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य लांबोळे पुढे म्हणाले की, जनार्दन महाराज हे शिक्षण महर्षी होती.आपल्या आदिवासी समाजाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड तळमळ होती. अज्ञान, अंधश्रद्धा, निरीक्षरतेच्या गर्तेत असणार्या या समाजाच्या विकास करायचा असेल तर शिक्षण हा त्यावरील रामबाण उपाय आहे,हे त्यांनी ओळखले आणि शिक्षणाचा प्रचार व प्रसार करायला सुरुवात केली. शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यामुळे सतपुड्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील मुले शिकली. सातपुड्याच्या सर्वागीण विकासात महाराजांचा सिंहाचा वाटा आहे.यावेळी प्राचार्य लांबोळे यांनी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित स्वरचित कविता वाचन करून दाखवली. विद्यार्थी, मान्यवर व शाळेच्या प्राध्यापकांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केलीत.कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मगन परमार यांच्याकडून जनार्दन महाराज यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त करणार्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सुनील पिंपळे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.ए.के.पाडवी, प्रा.बाजीराव पाडवी, प्रा.बी.बी.वळवी, प्रा.आरडी.जाधव, प्रा.विजय परमारकर, प्रा.एच.जे.वळवी, प्रा.एम.व्ही.सराफ,प्रा.एम.एस.वळवी, प्रा.जी.एस.राहसे आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यानी परिश्रम घेतले.