जनार्दन हरिजी महाराज यांचा अमेरिकेत कार्यक्रम

0

फैजपूर। येथील श्री सतपंथ मंदिर संस्था तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेली सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज 14 रोजी अमेरिकेत जाणार असून अमेरिकेतील विविध शहरांमध्ये त्यांचे प्रवचन, सत्संग, शिष्यांच्या भेटी आदी कार्यक्रम आयोजित केले आहे.

20 दिवसीय सत्संग कार्यक्रम
14 जुलै ते 5 ऑगस्ट यादरम्यान जनार्दन महाराज 14 रोजी न्युयॉर्कला जाणार आहे. 15 ते 18 दरम्यान न्यू कंबरलँड (पेनेसेलवनिया) येथे 16 रोजी सत्संग, 19 व 20 रोजी क्लियरफिल्ड पिटर्सबर्ग येथे, 21 ते 25 दरम्यान फ्लोरिडा, 26 ते 28 सेंट लुईस, 29 ते 31 दरम्यान शिकागो येथे, 1 व 2 ऑगस्ट रोजी न्यू जर्सी, 3 रोजी संध्याकाळी संकटमोचन हनुमान मंदिर, हिलसाईड न्युयॉर्क येथे सत्संग, 4 न्युयॉर्क येथे कार्यक्रम तर 5 रोजी भारतात आगमन असा नियोजित कार्यक्रम राहणार आहे. जनार्दन हरिजी महाराजांवर अतुट श्रध्द असलेले अमेरिकास्थित असंख्य सतपंथ अनुयायी यांनी या कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन केले आहे. याआधीही महाराजांचा दोन वेळा इंग्लंड येथे यशस्वी दौरा झाला आहे.

तिसर्‍यांना प्रवचनासाठी परदेश दौरा
ग्रामीण भागातील प्रवचनकर्ता जनार्दन महाराज हे आपले प्रवचन भारतामध्ये ठिकठिकाणी करत असतांना फैजपूर येथील महामंडलेश्‍वर 14 जुलैपासून भारत सोडून परदेशामध्ये भगवत गीताच्या प्रवचनासाठी जाण्याची संधी तिसर्‍यांदा मिळाली आहे. भारतीय नागरीक परदेशात असल्यामुळे धार्मिक, अध्यात्मिक प्रवचनापासून दुरावले होते. आता भारताच्या संस्कृतीची देश सोडून गेलेल्या नागरिकांना पुन्हा आठवण महामंडलेश्‍वरांच्या प्रवचनातून होईल.